दिवा लावून सावंतवाडीत शहीद सैनिकांना अनोखी श्रध्दांजली…

0
53

अखिल भारतीय पुर्वसैनिक सेवा परिषदेचे आयोजन; माजी सैनिकांसह नागरिकांचा सहभाग

सावंतवाडी,दि.११: माजी सैनिकांच्या माध्यमातून आज सावंतवाडीत शहीद झालेल्या सैनिकांना आज अनोख्या पध्दतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी “एक दिवा सैनिकांसाठी” असा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी येथील श्रीराम वाचन मंदिर परिसरात तलावाकाठी दिवे लावून रोषणाई करण्यात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. अखिल भारतीय पुर्वसैनिक सेवा परिषदेच्या माध्यमातून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा शुभारंभ करीत सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रविणकुमार ठाकरे, भरत गावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष नईम मेमन, यांच्यासह अखिल भारतीय पुर्वसैनिक सेवा परिषदेचे कोकण सचिव आनंद साधले, रामचंद्र सावंत, धोंडू पास्ते, महादेव राऊळ, उमेश गावडे, नारायण कर्पे, विजय कविटकर, नामदेव सावंत, गजानन गावडे, जगन्नाथ परब, मंगेश पेडणेकर, प्रविण गावडे, उत्तम कदम, उमेश कारिवडेकर, महेश पालव, रामचंद्र सावंत, महादेव देसाई, राजेश सावंत, तात्या सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here