सावंतवाडी,दि.१० : ओंकार कलामंच व सावंतवाडी तालुका व शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने उद्या शनिवार ११ रोजी येथील मोती तलावाच्या काठावर नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा बाल गट व मोठा गट अशी घेतली जाणार आहे. मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक ११ हजार १११ द्वितीय क्रमांक ७ हजार ७७७ तृतीय क्रमांक ५ हजार ५५५ असे ठेवण्यात आले आहे.
तर बालगटासाठी प्रथम क्रमांक ५ हजार ५५५ द्वितीय क्रमांक २ हजार २२२ तर उत्तेजनार्थ तीन बक्षीसं देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित मंडळांनी भुवन नाईक – ९६०७२९३५८८, हंजला नाईक – ७२४९७७०८३८, सचिन मोरजकर – ९४२११११६१६, कृपेश राठोड – ७७६०२०८०१४, हेमंत पांगम – ९४२२५०५००३ या नंबरवर नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.