सावंतवाडीत महामानव डॉक्टर आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना..
सावंतवाडी, दि.०६: संस्थानकालीन सावंतवाडी भूमीत सन १९३२ मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पदस्पर्श झाला .आणि त्यांच्याच पदस्पर्शाने सावंतवाडीची ही भूमी चैतन्य झाली ती भूमी आज समता प्रेरणाभूमी म्हणून महाराष्ट्रात ओळखली जावी. यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करावे .अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या साहित्य प्रेमी कडून केली जात आहे. आणि ही साहित्य व्यापक चळवळ या क्रांती भूमीतून त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर उगम व्हावा. असे मत साहित्यप्रेमी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले सावंतवाडी येथील समता प्रेरणा भूमी येथे आज मंगळवारी ६ डिसेंबर रोजी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त एका महान साहित्यिकाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांकडून आज सावंतवाडीत मानवंदना देण्यात आल्या. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला श्री साळगावकर यांनी पुष्पहार अर्पण केला .
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲडवोकेट संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे,
सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर,सहसचिव राजू तावडे, जिल्हा सदस्य प्राध्यापक सुभाष गोवेकर, प्राध्यापक रुपेश पाटील ज्येष्ठ कवी साहित्यिक प्रकाश तेंडुलकर, कवी दीपक पटेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत, भोसले, कवियत्री स्नेहा कदम, ममता जाधव, भावना कदम, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, एकनाथ कांबळे, अनंत कदम,शैलेश मयेकर,आनंद धोंड, शुभम धुरी, निखिल माळकर,आदी मान्यवर उपस्थित होते.