सावंतवाडी,दि ३०: केतन उदय सावंत उर्फ जादूगार केतनकुमार यांच्या वाढदिवसा निमीत्त ठेवण्यात आलेल्या नेञ तपासणी शिबीरास कुणकेरी गावातुन एकूण ९३ लोकांनी लाभ घेतला.कुणकेरीत प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुणकेरी आयोजित लाॅरेन्स अॅड मेयो पुरस्कृत नेञ तपासणी शिबीर मनसे सैनिक सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला,या शिबीरास गावातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी दरवर्षी असेच लोक उपयोगी कार्यक्रम नक्की घेऊ असे यावेळी केतनकुमार म्हणाले.
यावेळी मनसेचे नेते महाराष्ट्र सरचिटणीस संदिप दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अॅड. अनिल केसरकर आणि सावंतवाडी संपर्क अध्यक्ष महेश परब, कुणकेरी गावचे सरपंच सोनिया सावंत, कुणकेरी ग्रामपंचायत सदस्य आत्मेश सावंत, ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे सदस्य राणे महाराज, कला क्रीडा विकास मंडळ कुणकेरी वाचनालय यांचे खजिनदार राजन मडवळ, सावंतवाडीतील हॉटेल व टुरिस्ट उद्योजक अवधूत नाटेकर, मळगाव माजी शाखा अध्यक्ष राकेश परब, दशावतारातील हार्मोनियम वादक बुवा संकेत कुडव, शंकर गुरव, शतायु जांभळे, भूषण सावंत, साईल तळकटकर, अनिकेत दळवी, दिपाली राऊळ, संध्या पाताडे आकाश मराठ, ओंकार नवार, प्रथम राठोड, उदय सावंत, अर्जुन गावकर, पांडुरंग सावंत, जय राऊळ, रामचंद्र सावंत, गौरव राऊळ, सद्गुरू पुजारी, आप्पा परब, तुकाराम कुणकेरकर इतर सर्व व केतन सावंत मित्र मंडळाचे सदस्य आणि लाॅरेन्स अॅड मेयो राणे मॅडम ची सर्व टिम उपस्थित होती.