प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी,दि.१८: येथील विधानसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले असुन त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी गवळी तिठा येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजप कार्यालय व वाॅर रूम तयार करण्यात आले आहे. या वाॅर रूमचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गुरुवार १९ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता होणार आहे. या कार्यालयातुन वाॅर
रूम मधून थेट प्रदेश कार्यालयाशी दररोज संपर्क होणार आहे.
अशी माहिती माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब,मनोज नाईक आनंद नेवगी निशांत तोरस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री तेली म्हणाले प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे उद्या १९ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा कणकवली येथे मेळावा होणार आहेत तसेच वॉरियर्स ची बैठक घेणार आहेत त्यानंतर घर घर अभियान शुभारंभ करणार आहेत त्यानंतर सायंकाळी सात वाजता श्री बावनकुळे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी खासदार निलेश राणे, सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आदी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वप्रथम श्री बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य स्वागत होणार आहे नंतर ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. भाजप विधानसभा कार्यालयाचे उद्घाटन आणि वाॅर रूम चा शुभारंभ होणार आहे तरी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तेली यांनी केले आहे.