सावंतवाडी,दि.१५ : भाजपा नेते,युवा उद्योजक विशाल परब यांच्या आज होणाऱ्या वाढदिवसाला केद्रीय मंत्री नारायण राणे,भागवत कराड, श्रीपाद नाईक यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे,गोव्याचे खासदार सदानंद तानावडे, आमदार चंद्रकांत शेट्ये, सिंधुदुर्ग जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रमोद जठार, अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहीती भाजपा पदाधिकारी व विशाल परब मित्रमंडळाकडून देण्यात आली.
जिमखाना मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाची पूर्ण तयारी करण्यात आली असून कडक पोलीस बंदोबस्त व खाजगी सुरक्षेमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.