तळकट ग्रामस्थांचे बांधकाम विभागाला निवेदन..
दोडामार्ग,दि.१४: येथील खडपडे तिठा ते भेकुर्ली रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढल्याने रस्ता वाहतूक धोकादायक ठरत आहे. याबाबत सदरचा रस्ता सुरळीत करावा असे लेखी निवेदन तळकट सरपंच सुरेंद्र सावंत यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागला दिले आहे.
दरम्यान येत्या आठ दिवसात झाडी व इतर काम करून रस्ता वाहतुकी सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहे.
यावेळी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत, गंगाराम देसाई, विनायक देसाई, सखाराम देसाई, शिवानंद देसाई, ऋषिकेश राऊळ ,प्रथमेश सावंत, विक्रांत सावंत आदी उपस्थित होते.