…तर सचिवपदी गुरुदास गवंडे यांची फेर निवड
बांदा, दि.१०: श्री देवी माऊली निगुडे नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नारायण शांताराम राणे यांची एक मताने निवड करण्यात आली.तर सचिवपदी गुरुदास गवंडे यांची फेर निवड करण्यात आली.
यावेळी नवरात्र उत्सवातील विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.निगुडे माऊली मंदिरात मंडळाची सभा माजी अध्यक्ष नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्वानुमते गेली चार वर्षे नवरात्र उत्सव समितीचे कार्य चांगले असल्यामुळे पाचव्या वर्षीही बिनविरोध सर्वांची निवड झाली. देवस्थानचे मानकरी गंगाराम गावडे, उपाध्यक्षपदी दीपक गावडे, खजिनदार राजेश मयेकर, सहखजिनदार संदीप राणे, समीर गावडे, बाबली तुळसकर, लक्ष्मण निगुडकर, पुरुषोत्तम गावडे, नाना खडपकर, महादेव नाईक, अजित तुळसकर, रवींद्र गावडे ,मनोहर नाईक, सुधीर गावडे, शंकर निगुडकर, बापू गावडे, प्रकाश देसाई, कृष्णा सावळ, उमेश गावडे आदीसह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सभेत दशावतार नाटके, भजने, गरबा नृत्य, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, साऊंड सिस्टम, महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत नियोजन करण्यात आले. आभार गुरुदास गवंडे यांनी मानले.