…अखेर सावंतवाडी पंचायत समिती च्या नूतन इमारतीचा प्रश्न पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मार्गी…

0
73

भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून दिली माहिती.

सावंतवाडी,दि.१०: गेली अनेक वर्षे सावंतवाडी पंचायत समिती च्या नुतन इमारतीचा प्रश्न रेंगाळला होता.या प्रश्नाला अखेर सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण याच्या माध्यमातून मार्गी लागल्याची माहिती भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
या इमारतीच्या नवीन बांधकामासाठी तब्बल १४ कोटि ६० लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे म्हटले असून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
सावंतवाडी पंचायत समितीचा प्रश्न गेली अनेक वर्षे रेंगाळला होता.इमारत बांधकामासाठी पुरेसी जागा उपलब्ध होत नव्हती त्यातच जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारत बांधणे सोयीस्कर नसल्याने अखेर सध्याच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागांच्या जागेत इमारत बाधण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीत सावंतवाडी पंचायत समितीच्या अद्ययावत नवीन इमारत उभारणीसाठी १४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी ही मंजूर करण्यात आला आहे. नवीन इमारतीच्या कामास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. सावंतवाडी पंचायत समितीची नवीन इमारत न्यू शिरोडा नाका येथील २७ गुंठे जागेत आता ही इमारत उभी राहणार आहे.पंचायत समितीची नुतन इमारत उभी राहावी यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात येत होता.अखेर त्यांच्याच पुढाकारातून हे काम मार्गी लागल्याचे सारंग यांनी सांगितले.
तसेच इमारत व्हावी माझ्यासोबतच माजी उपसभापती शितल राऊळ व माजी जि. प . सदस्या रेश्मा सावंत ,माजी सभापती रवींद्र मडगावकर, मानसी धुरी, माजी सभापती प्रमोद सावंत, यांनीही विशेष पाठपुरावा केला होता असेही सारंग म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here