अखिल महाराष्ट्र डोंबारी समाज संघटनेच्या वतीने स्मशानभूमी जागा निश्चिती करणेबाबत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन..

0
158

सावंतवाडी,दि.०५: शहरातील डोंबारी समाज हा बऱ्याच वर्षापासून सावंतवाडीत स्थलांतरित आहे. परंतु सध्या स्थितीत या समाजातील काही व्यक्ती मृत पावल्यास ती दफन करण्यासाठी जागे संदर्भात मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्याचबरोबर त्या स्मशानभूमीमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने संघटनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मशानभूमी जागा निश्चिती संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी लवकर तोडगा काढू व त्या स्मशानभूमी च्या जागेत विविध सोयी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी अखिल महाराष्ट्र डोंबरी समाज संघटनेचे अध्यक्ष मयूर लाखे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी, कार्याध्यक्ष सुरेश सोनटक्के, उपाध्यक्ष भारत लाखे, सचिव नरेश खोरागडे, शिवाजी पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here