मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष.ॲड संतोष सावंत यांची माहिती
सावंतवाडी,दि.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मालवणी कवी, गीतकार दादा मडकईकर यांचा भव्य सत्कार व त्यांच्या गीतांचा सोहळा कार्यक्रम लवकरच कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी व सह्याद्री फाउंडेशन वतीने घेण्यात येणार आहे श्री मडकईकर यांचा अमृत महोत्सव उपक्रम घेण्यात येणार आहे अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष.ॲड संतोष सावंत सह्याद्री फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी दिली. मालवणी गीतांचा सोहळा व अमृत महोत्सव साहित्य उपक्रम येत्या दिवाळी सणाच्या अगोदर घेण्यात येणार आहे असेही ठरवण्यात आले यावेळी श्री मडकईकर यांचा ज्येष्ठ इतिहासकार व साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा यांच्याहस्ते दादा मडकईकर यांचे पुष्पगुच्छ, फ़ुलहार तसेच ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ इतिहासकार जी ए बुवा सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, जिल्हा शाखेचे खजिनदार भरत गावडे, सदस्य कवी दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मालवणी कवी गीतकार हे एक साहित्यिक आहेत आणि त्यांचा अमृत महोत्सव सोहळा निमित्ताने खास त्यांनी साकारलेल्या कवितांची मैफिल आयोजित करून सावंतवाडीकरांसाठी मडकईकर यांचे मालवणी कविता चा जागर उपक्रम घेऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे दिवाळी सणापूर्वी हा उपक्रम घेतला जाणार आहे असे ठरवण्यात आले.