या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कलाकारांची हजेरी..
सावंतवाडी,दि.२६ :शालेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथील बॅ. नाथ पै सभागृहात मराठी हिंदी गाण्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडी पालिकेच्या गणपती बाप्पाकडे आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात आज सुशांत शेलार आणि दिगंबर नाईक तर २७ तारखेला बेधुंद म्युझिकल नाईट या आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सुर नवा ध्यास नवा फेम संज्योती जगदाळे तर हिंदी – मराठी गायक स्वप्नील गोडबोल उपस्थित राहणार आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येथील बॅ. नाथ पै सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमात शेलार आणि नाईक यांच्यासह रोहित राऊत, जुईली जोगळेकर, अमृता घोंगडे, पुर्वी भावे आणि मधुरा जोशी- दिवेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.