ब्रेकींग मालवणीची जिल्हास्तरीय खुली ऑनलाईन अभंग स्पर्धा…

0
123

२१ हजाराचे पहिले बक्षीस; नवोदित २ बुवांना विशेष बक्षीस देऊन गौरविणार…

सावंतवाडी,दि.२०:खास गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ब्रेकींग मालवणी परिवाराच्या माध्यमातून जिल्हास्तरीय खुली ऑनलाईन अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा मानकरी ठरणार्‍या संघाला २१ हजार, द्वितीय संघाला ११ हजार तृतीय संघाला ५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर नवोदीत २ गायकांना प्रत्येकी ३ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट गायक, टाळ, पखवाज तबला आणि टाळ वादकाला प्रत्येकी एक हजार रूपये देवून गौरविण्यात येणार आहे
ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी १ हजार १ इतकी असणार आहे. विशेष म्हणजे शुटींग करण्यात आलेला अभंग सात मिनिटांपेक्षा जास्त नसावा, अभंग संत रचित असावा सिनेमाची चाल नसावी, १० ऑक्टोंबर पुर्वी स्पर्धकांनी आपला व्हिडिओ पाठवावा, त्याच बरोबर व्हिडीओ पाठवताना त्यावर गायक, कलाकार किंवा मंडळाचे नाव तसेच सहकलाकार यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, स्पर्धेची नाव नोंदणी २० ते ३० सप्टेंबरपर्यंत करावी, तज्ञ परीक्षकांकडून या स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे, तसेच स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या स्कॅनर वर प्रवेश फी गुगल-पे द्वारा जमा करून त्याचा स्क्रीनशॉट आणि सोबत नाव, पत्ता, मोबाईल नंबर याचा तपशील खालील नंबर वर पाठवावा, हा व्हिडीओ ब्रेकींग मालवणीच्या युटयूब पेजवर टाकण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्‍या स्पर्धकांनी आपल्या व्हिडीयो यात सहभागी होणार्‍या स्पर्धकांनी आपला व्हिडीओ शुट करुन ब्रेकींग मालवणीच्या ९४२००१०७७७ ९५०३५०१७८०
८२७५२१११२६ ९६०७२९३५८८ या नंबरवर पाठवावा तसेच अधिक माहीतीसाठी
याच नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन ब्रेकींग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here