फाउंडेशनचे संस्थापक आबा दळवी यांनी जाहीर केली राज्य कार्यकारणी
सिंधुदुर्ग,दि.१५: एस आर दळवी फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी अध्यक्षपदी सिंधुदुर्गचे या फाउंडेशनचे माजी जिल्हाध्यक्ष महेश लाडू सावंत यांची, उपाध्यक्षपदी मनोज सुतार ( रायगड ), हनुमंत जाधव ( पुणे ) तर सचिवपदी इम्तियाज सिद्दीकी ( रत्नागिरी ), सहसचिवपदी वरुनाक्षी आंद्रे ( पालघर ) यांची निवड करण्यात आली आहे. या फाउंडेशनचे संस्थापक रामचंद्र ऊर्फ आबा दळवी आणी सिता दळवी यांनी ही राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे.
विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र ऊर्फ आबा दळवी आणी सिता दळवी यांनी शिक्षक सक्षमिकरण आणी पर्यावरण संवर्धन हे मूळ उद्देश समोर ठेऊन दोन वर्षांपूर्वी या एन. जी. ओ. फाउंडेशनची स्थापना मुंबईत केली. या फाउंडेशनच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून डिजिटल युगात शिक्षक सक्षम होण्यासाठी विविध प्रशिक्षणे तसेच अनेक शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे फाउंडेशनच्या या उद्देशपूर्तीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे तसेच फाउंडेशनच्या या कार्यात राज्यभरातील सर्व शिक्षकांनी सहभागी असे आवाहन रामचंद्र ऊर्फ आबा दळवी आणी सिता दळवी यांनी केले आहे.
यावेळी फाउंडेशनचे नवनियुकत राज्याध्यक्ष महेश सावंत यांनी या फाउंडेशनमार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच पर्यावरण पूरक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगुन सदर फाउंडेशन हे सर्व स्तरातील शिक्षकांसाठी असल्याने कोणीही शिक्षक या फाउंडेशनमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.