सावंतवाडी,दि.१३: केंद्र आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्याच्या योजना तळागाळात पोहचविण्याचे काम आरोग्य केंद्र, उपकेंद्रे करत आहेत आता पत्रकारांनी करावे प्रत्येकाने दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी केल्यास भविष्यात सुदृढ जीवन जगता येऊ शकते,अवयवदान करून मृत्यू नंतरही दुसऱ्यांना जीवन देण्याचे पुण्यकर्म करा असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सावंतवाडी येथे बोलताना केले.
ते आयुष्यमान भव सामुदायिक आरोग्य सुविधेच्या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी येथील उपजिल्हा रुग्णालयात बोलत होते.बुधवारी दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास देशाच्या राष्ट्रपती राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या हस्ते आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ झाला त्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील रुग्णांकरिता आयुष्यमान भव योजनेचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला या कार्यक्रमास तहसीलदार श्रीधर पाटील ,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख
अशोक दळवी, अटल प्रतिष्ठानचे नकुल पार्सेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर, कळसुलकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नारायण मानकर तसेच रक्त मित्र संघटनेचे अध्यक्ष देव्या चव्हाण, डॉ मुरली चव्हाण आदी उपस्थित होते.
वैद्यकीय अधीक्षक डॉ ऐवळे यांनी योजनेची माहिती दिली ते म्हणाले.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत त्यानंतर ३१ डिसेंबर पर्यत आयुष्यमान भव योजनेच्या प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे जुन्या योजनेमध्ये सुधारणा करून
१८वर्षावरील पुरुष, रक्तदान,लहान मुलांची आरोग्य तपासणी शिबिरांचा समावेश करण्यात आला आहे योजनेमध्ये.प्रसुती,स्त्रीरोग, बालरोग,नेत्रविकार शस्त्रक्रिया, मानसोपचार या विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पारसेकर यांनी शुभेच्छा दिल्या . जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनी ग्रामीण भागात आयुष्यमान योजना पोहचली पाहिजे. सामाजिक संस्था, संघटनांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.
डॉ अदिती कशाळीकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदारी कार्ड हे आयुष्यमान ला जोडले गेले आहे. नागरिकांनी हेल्थकार्ड घ्यावे एनसीडी अंतर्गत सर्व माहिती रूग्णांची साठवली जाते.आ.भा.कार्ड काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सावंतवाडीत कुष्ठरोग्यांवर काम करणाऱ्या १७ निश्चयमित्रांपैकी बांदा रोटरी क्लब डॉ सागर जाधव श्री दळवी आदींचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आला डॉ कशाळीकर यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ पांडुरंग वजराठकर यांनी केले.