सावंतवाडी, दि.११: शहरातील आयएसओ मानांकित शाळा सावंतवाडी नंबर (१) चार च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री संतोष तळवणे कर यांची पुनश्च निवड झालेली असून त्यांच्या निवडीबद्दल समस्त पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. श्री संतोष तळवनेकर हे २०११ पासून ते आज पर्यंत शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांच्या कार्यकाळात शाळेला उत्तुंग यश मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.शाळा विकासाची अनेक कामे त्यांनी आपल्या कार्यकाळात शाळा व्यवस्थान समितीच्या सहकार्याने केली आहेत.
शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने त्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक उठाव करण्यात आला.
शाळा व्यवस्थापित कमिटीने २०११ ते २०२३ या कालावधी मध्ये केलेली कामे खालील प्रमाणे..
▪️नवीन दुमजली, भव्य व सुंदर इमारतीची उभारणी
▪️मान.आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री नामदार दीपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून तीन लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे पाच संगणक, एक प्रिंटर, एक टिव्ही घेतला.
▪️भगीरथ प्रतिष्ठान झाराप यांच्या कडून एक टिव्ही, आरोग्यविषयक साहित्य, दहा गणवेश मिळविले.
▪️मान.शैलेश पै (कोलगांव) यांजकडून तीन हजार लिटरच्या पाण्याच्या दोन टाक्या घेतल्या.
▪️मे.नाईक ॲंड कंपनी यांजकडून पाण्याचा पंप सेट व पाईप मिळविला.
▪️ श्रीमती कविता धुरी मॅडम यांच्या कडून भव्य, सुंदर व आकर्षक प्रवेशद्वार मिळविले.
▪️ पालकांकडून ४२ खुर्च्या घेतल्या.
▪️ श्री.संतोष तळवणेकर अध्यक्ष यांजकडून रुपये १५ हजार चे लोखंडी गेट तयार करून घेतले.तसेच इन्सि .नरेटर फिटिंग,बल्ब, ट्यूब लाइट दिले व फिटिंग करून घेतलं.
▪️ सन्माननीय श्री जीवा राऊळ यांजकडून एक टिव्ही घेतली.
▪️प्रथम फाऊंडेशन मुंबई यांजकडून दोन टिव्ही मिळविल्या.
▪️रूपाली दत्तप्रसाद गावडे ..मोठी समई व मोठा .टेबल फॅन
नवीन शाळा व्यवस्थापन समिती सन २०२३-२४.
शाळा – जि.प.पू.प्रा.शाळा सावंतवाडी नं.४
१) श्री. संतोष शिवाजी तळवणेकर – अध्यक्ष
२) श्रीम. गुंजन गजानन गावडे – उपाध्यक्ष
३) श्रीम. वेदा रुपेश गावडे – सदस्य
४) श्रीम. संचिता सचिन गावडे – सदस्य
५) श्रीम. अस्मिता अ. तळवणेकर – सदस्य
६) श्रीम. सचिन बिरोडकर – सदस्य
७) श्रीम. रूपाली द. गावडे – सदस्य
८) श्री. प्रमोद दत्तात्रय देसाई – सदस्य
९) श्रीम. आरती मिथुन जाधव – सदस्य
१०) श्रीम. समृद्धी शिवशंभो विरनोडकर – स्था.प्रा
११) श्री. गिरिधर विश्वनाथ परांजपे – शिक्षणतज्ञ
१२) श्री. गुंजन गजानन गावडे – दिव्यांग प्रतिनिधी
१३) श्रीम. लक्ष्मी लक्ष्मण धारगळकर – शि. प्रतिनिधी
१४) अमिता प्रमोद देसाई – वि. प्रतिनिधि
१५) हर्ष रवींद्रनाथ गोसावी – वि. प्रतिनिधि
१६) ध्रुवसिंग हुरज्या पावरा -सचिव
शाळेचे मुख्याध्यापक श्री पावरा सर यांनी अध्यक्ष श्री संतोष कळवणकर आणि पूर्ण समितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या निवडीबद्दल त्यांच्यावर शिक्षक आणि पालक वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.