सावंतवाडी,दि.०२: सध्या देशात व राज्यात असलेल्या जनविरोधी सत्ताधाऱ्यांपासून जनतेला मुक्त करण्यासाठी INDIA च्या रूपाने देशव्यापी आघाडी तयार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे सक्रिय मार्गदर्शन यासाठी लाभत आहे.
पक्षाध्यक्ष पवारांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत राज्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेर्ले, पडवेमाजगाव व इन्सुली येथील गौरांग शेर्लेकर,सौ. प्रतीक्षा गवस, प्रवीण गवस, सौ. स्वरा पेंडुरकर, रवींद्र बांदेकर प्रसाद देसाई, नंदू कदम,अमर धुरी,दिनेश शेर्लेकर,लाडू धुरी आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी सौ.अर्चना घारे यांनी त्यांचे स्वागत केले. व
शरद पवार यांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, विशाल पांगम, संतोष जोईल, तालुका चिटणीस समीर सातार्डेकर, युवक उपाध्यक्ष विवेक गवस, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, ओबीसी सेल दोडामार्ग तालुकाध्यक्ष उल्हास नाईक, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष संजय भाईप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.