कोनाळ येथील श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे दि.१ ते ३ सप्टेंबर रोजी निमंत्रित जिल्हास्तरीय खुली भजन स्पर्धेचे आयोजन…

0
72

दोडामार्ग दि.०१: कोनाळ येथील श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे दि.१,२ व ३ सप्टेंबर रोजी निमंत्रित जिल्हास्तरीय खुली भजन स्पर्धेचे आयोजन खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. आज शुक्रवार दि.१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते भजन स्पर्धा उद्घाटन करण्यात येणार आहे.

या निमंत्रिताच्या खुल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत सहभागी संघाना प्रत्येकी एक हजार रुपयांचे मानधन, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी प्रायोजित करून विशेष सहकार्य भजन स्पर्धेला केले आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १० हजार रुपये (कै. सुलोचना तुकाराम सावंत यांच्या स्मरणार्थ सौ सुचिता सुरेश दळवी यांजकडून),द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये (कै फटीराव देसाई यांच्या स्मरणार्थ श्नी.प्रेमानंद देसाई, केर यांजकडून) ,तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये (कै जिवाजी लोंढे यांच्या स्मरणार्थ श्नी.प्रेमानंद उर्फ बबन लोंढे यांजकडून) तर चतुर्थ पारितोषिक २ हजार रुपये ( कै गणपत लोंढे यांच्या स्मरणार्थ श्नी.कृष्णा लोंढे यांजकडून) ठेवण्यात आले आहेत.
या स्पर्धेतील सर्व चषके कै दत्ताराम लोंढे यांच्या स्मरणार्थ माजगाव येथील विश्वनाथ उर्फ उमेश सावंत यांनी प्रायोजित केली आहेत.

या स्पर्धेत अन्य वैयक्तिक पारितोषिक व सन्मानचिन्ह आकर्षक बक्षिसे:-उत्कृष्ट हार्मोनियम ५०० रुपये व चषक (श्री.रामराव राजाराम लोंढे यांजकडून) ,उत्कृष्ट तबला ५०० रुपये व चषक (श्री.अजय सावंत याजकडून),उत्कृष्ट पखवाज ५०० रुपये व चषक (श्री.चिंतामणी ज्ञानेश्वर लोंढे यासकडून),उत्कृष्ट गायक ५०० रुपये व चषक (श्री.काशीराम धोंडी निंबाळकर याजकडून),उत्कृष्ट कोरस ५०० रुपये व चषक (श्री.प्रज्ञेश महादेव लोंढे याजकडून) ,झांज महेश लोंढे यांजकडून प्रायोजित करण्यात आली आहेत.

आज शुक्रवार दि.१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते भजन स्पर्धा उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता स्वरसगंम भजन मंडळ मेढे सोनावळ, रात्री ८ वाजता श्री सातेरी पुर्वाचारी भजन मंडळ माटणे, रात्री ९ वाजता श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ बडोदे यांचे सादरीकरण होणार आहे.
शनिवार दि.२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री देव सावंतवस प्रासादिक भजन मंडळ इन्सुली, सायंकाळी ७ वाजता श्री सातेरी प्रासादिक भजन मंडळ सातुळी, रात्री ८ वाजता श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली, रात्री ९ वाजता श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ माजगाव यांचे सादरीकरण होणार आहे.
रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री शांतादुर्गा प्रासादिक भजन मंडळ खोक्रल, सायंकाळी ७ वाजता श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ माडखोल, रात्री ८ वाजता स्वराभिक भजन मंडळ मणेरी, रात्री ९ वाजता स्वरधारा भजन मंडळ तांबोळी यांचे सादरीकरण होणार आहे.
या भजनाचे परिक्षक प्रथम तीन क्रमांक, उत्तेजनार्थ व विशेष सादरीकरण परीक्षण जाहीर करतील. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होणार आहे असे आयोजकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here