सावंतवाडी,दि.२३ : शहरातील खासकीलवाडा परिसरातील आयुर्वेदिक कॉलेज शेजारील वालावलकर पाणंद येथील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी नगरपालिका प्रशासनाने काल अर्धवट तोडल्याने तेथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पावसाळयात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. ही झाडी तोडण्यात यावी, अशी मागणी लेखी स्वरूपात तेथील नागरिकांनी नगरपालिका
प्रशासनाकडे केली होती. परंतु वारंवार मागणी करून देखील नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, काल प्रशासनाला जाग आल्यानंतर त्यांनी तेथील झाडी तोडण्याचे काम हाती घेतले. पण सबंधित काम अर्धवट केल्याने, तेथील नागरिकांना ये – जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या या अर्धवट धोरणाने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, अशी संतापजनक प्रतिक्रिया सदर परिसरातील नागरिकांनी दिली.