दिवंगत वायरमन धनंजय फाले यांच्या कुटुंबीयांना अहिल्याबाई समाज मंडळामार्फत आर्थिक मदत…

0
93

माणगाव,दि.२२:महादेवाचे केरवडे येथील वायरमन धनंजय फाले यांचा सेवेत असताना लाईटच्या पोलवर शॉक लागून काही दिवसांनी दुर्दैवी मृत्यू झाला होता. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून अहिल्याबाई धनगर समाज मंडळ गोठोस धनगरवाडी व गोठोस गावातील काही दानशूर व्यक्तींनी धनंजय याच्या कुटुंबीयांना आर्थिक स्वरूपात मदत जमा केली. गोठोस येथील अहिल्याबाई धनगर समाज मंडळ विविध समाज उपयोगी उपक्रम घेत असते. या मंडळाचे कार्यकर्ते नैसर्गिक हानी, पर्यावरण, सामाजिक प्रबोधन, कौटुंबिक स्थिरता या विषयावर नेहमीच काम करत असतात. हाच धागा पकडून धनंजयच्या कुटुंबीयांना फुल न फुलाची पाकळी मदत होईल या हेतूने २०,००० रुपयांची मदत त्यांना सुपूर्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here