सावंतवाडी,दि.१६: तालुक्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळीकडे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावाला सैनिकांची परंपरा आहे या पंचक्रोशीतील बहुतांश लोकांनी सैन दलात रुजू होऊन देश सेवा केली आहे.
काल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपा आंबोली मंडळ च्या वतीने येथील शहीद जवानांच्या स्मारकास हार पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ ,सांगली सरपंच लवू भिंगारे, कलंबिस्त भूथ अध्यक्ष कृष्णा सावंत,अनिल सावंत, माजी सैनिक दिनानाथ सावंत, सगुण पास्ते,अनंत सावंत,आनंद सावंत,भास्कर कोचरेकर सखाराम राऊळ, मधु कदम आदी मान्यवर उपस्थित होते.