सावंतवाडी,दि.१३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या प्रत्येक गावापासून दिल्ली पर्यंत जनतेला आवाहन केले आहे.आणि याचाच भाग म्हणून सहयाद्रीच्या कुशीत वसलेले अगदी निसर्गाचे वरदान लाभलेले असे निसर्गसंपन्न वेर्ले हे गाव.
या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडून मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात आला.
आपल्या देशाच्या स्वतंत्र लढ्यात,सहभागी स्वतंत्र सैनिक, आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी लढणारे आमचे आजी माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला.
वेर्ले गावातील सैनिकांनी अगदी दुसऱ्या महायुद्धापासून, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कर्तुत्व बजावत देश सेवा केली आहे.
वेर्ले गावाने सैनिक सेवेची परंपरा जपली आहे. याचा उचित मान सन्मान आपल्या देशात गावापासून राजधानी पर्यंत केला जात आहे.
यासाठी आमच्या गावातील ग्रामपंचायत, आणि सर्व जनतेला , तसेच सावंतवाडी पंचायत समितीच्या आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने देशाचे पंतप्रधान यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांचे अभिनंदन करतो अशा प्रकारचे मत सैनिक संघटना अध्यक्ष बाळकृष्ण बाबाजी राऊळ यांनी व्यक्त केले आहे.