सावंतवाडी, दि.११: येथील बांदा येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,शाखा – सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी १.०० या वेळेत विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालय बांदा येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने अक्षय मयेकर (९५०३८७१९२४) यांनी केले आहे.