सावंतवाडी,दि.३१: तालुक्यातील कोनशी येथील उपसरपंच अर्जुन सावंत, ग्रामपंचायत सदस्या दिपाली गवस, वैशाली गवस आदी पदाधिकाऱ्यांसमवेत गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी लोकनेते आदरणीय खा.शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतला.
यात प्रामुख्याने शरद सावंत, विठ्ठल गवस, गंगाराम नाईक, सिद्धेश गवस, राजन गवस, दिलीप गवस, भरत सावंत, सहदेव सावंत तानाजी गवस पायाजी सावंत, न्हानू सावंत, सुभाष गवस,वैष्णवी सावंत, रसिका गवस, वंदना गवस, स्वरा गवस, स्मिता गवस, रंजना नाईक, तनवी गवस, सत्यभामा गवस, समीक्षा सावंत, दिप्ती गवस, सुमित्रा सावंत, सुचिता नाईक, सविता गवस, दीपांजली गवस, रसिका गवस, सुचिता गवस, शुभांगी गवस, उज्वला सावंत,गौरव गवस, भगवान गवस सुनील सावंत आदी ग्रामस्थांचा समावेश आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे म्हणाल्या की,”सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत जोडले जात आहेत. निश्चितच या सर्वांना अपेक्षित असलेला सावंतवाडी मतदारसंघ घडविण्यासाठी भविष्यात आपण पूर्णपणे प्रयत्नशील राहणार आहोत”.
या पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अशिफ शेख, तालुका चिटणीस समीर सातार्डेकर, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, शहर चिटणीस राकेश नेवगी, भालावल माजी सरपंच रमेश परब, विनायक सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.