कालेली माणगांव मुख्य रस्त्याला जोडणारे रेडेकोंड पुल वाहतुकीसाठी धोकादायक..
वेळोवेळी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून देखील हे पुल अजून दुर्लक्षित..
कुडाळ,दि.२२: तालुक्यातील कालेली येथील रेडेकोंड पूलावर खड्डे पडून साईड पट्टीने भेगा गेल्या आहेत.
याबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून सुद्धा याकडे दुर्लक्ष केला जात आहे.
जिल्हात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी या पूलावरून जाऊन पूल अधिक जीर्ण होत चालले आहे. त्यामुळे यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. दररोज माणगांव हायस्कूलची मुले तसेच कामासाठी ये-जा करणारी मंडळी ही रात्री उशिरापर्यंत त्या पुलावरून वाहतूक करत असतात.
या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने त्वरित या पुलाची डागडुजी करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.