नागरिकांची नाराजी, बांधकाम विभाग कार्यालया समोर छेडणार आंदोलन.. रवींद्र तावडे
सावंतवाडी,दि.२०: तालुक्यातील कलंबिस्त लिंगेश्वर मंदिर ते मळा येथील रस्त्याच्या दुतर्फा गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे तेथून ये – जा करणे धोकादाय ठरत आहे, त्यातच रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्याने मोटार सायकल चालक आणि येथून जाणारे शाळकरी मुले यांना मोठ्या प्रमाणात कसरत करत जावं लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन उपाय योजना कराव्यात अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण छेडले जाईल असा इशारा रॉयल बुलेट मंडळ कलंबिस्त -(गनशेळवाडी व शिवस्वराज्य मित्र मंडल कलंबिस्त – (मळा) व सामाजीक कार्यकर्ते श्री. रविंद्र तावडे यांनी दिला आहे.