शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भरगच्च कार्यक्रम …

0
61

सावंतवाडी, दि.१६: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तीन तालुक्यात १७ ते २३ या कालावधीत भरगच्च कार्यक्रम करून साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी आणि माजी नगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी नगरसेविका भारती मोरे, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नारायण राणे, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, लतिका सिंग, पुजा नाईक, निलिमा चलवादी, सायली होडावडेकर, जोस्ना मेस्त्री, भारती परब आदी उपस्थित होते.
दरम्यान वाढदिवसा दिवशी म्हणजेच १८ जुलै ला श्री. केसरकर अधिवेशन असल्यामुळे मतदार संघात उपस्थित रहाणार नाहीत .मात्र त्यांच्या सावंतवाडीतील कार्यालयात कार्यकर्त्यांकडून केक कापून वाढदिवस साजरा केला जाईल. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री पोकळे यांनी केले आहे . आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी माहिती देताना ते पुढे म्हणाले, १७ ते २३ जुलै या कालावधीत केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, कृषीविषयक आणि क्रीडा विषय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात तेथील कार्यकर्त्यांकडून राबविले जाणार आहेत. याच पार्श्वभूमी विशेष म्हणजे “मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प ” घेण्यात येणार आहे. यामध्ये १८ जुलैला शिरोडा ग्रामीण रुग्णालय, १९जुलैला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय, २० जुलैला दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय, २१ जुलैला साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र, २२ जुलै बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र, तर २३ जुलै ला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आदी सर्व ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून ही शिबिरे सुरू होणार आहेत. यावेळी तज्ञांकडून गुडघेदुखी, लिगामेंट इंजुरी, सपाट पाय आणि घोट्याचे दुखणे, खांदे दुखी, खुब्याच्या वेदना, खेळात होणाऱ्या दुखापती, पाठ दुखी – कंबर दुखी, चालताना त्रास होणे, सर्व प्रकारचे हाडांचे आजार आदींची तपासणी होणार आहे. या सेवेचा मतदारसंघातील रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी श्री. गवस म्हणाले, दोडामार्गा तालुक्यात सुद्धा विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात विशेष म्हणजे २३ जुलैला तीन गटात पुरुष व महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ श्री. केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. तर १४ वर्षाखालील, अठरा वर्षाखालील व खुला गट अशा तीन गटात पुरुष व महिलांसाठी तालुकास्तरावर ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तसेच लगेचच केसरकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील होईल, आणि केक कापून दोडामार्ग वासियांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here