कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक यांचा पत्रकार संघातर्फे सन्मान…

0
82

सिंधुदुर्ग,दि.१२: कोल्हापूर विभागाच्या अधिस्वीकृती समितीवर सदस्य पदी ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या नियुक्ती केल्या असून कोल्हापूर विभागाच्या अधिस्वीकृती समितीवर सावंतवाडीचे जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने आज शासकीय आदेश काढून समितीची घोषणा केली आहे. गजानन नाईक हे ज्येष्ठ संपादक असून गेली पन्नास वर्षे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेत सक्रिय आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवनासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.
तर कोल्हापूर विभागाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक म्हणाले, प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेला आहे. या नियमावलीनुसार राज्यातील प्रसारमाध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रे देण्याकरीता राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठीत करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्य अधिस्वीकृती समितीवर नेमणूक करण्यात आली असून गेले वर्ष दोन वर्ष या समितीच्या नियुक्ती रखडल्यानं अनेक पत्रकारांच्या अधिस्वीकृती अडकल्या होत्या. तांत्रिक दृष्ट्या काही अडचणी येत होत्या. या अडचणींतून योग्य मार्ग काढून अधिस्वीकृती पत्रे देत रखडलेले प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, राजेश मोंडकर, माजी अध्यक्ष प्रविण मांजरेकर, विजय देसाई, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अँड. संतोष सावंत, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर आदींनी मनोगत व्यक्त करत गजानन नाईक यांना शुभेच्छा दिल्या. अधिस्वीकृती समितीवर निवड झाल्यानं तालुका पत्रकार संघातील ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावे व निश्चितच ते तालुक्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देतील असा विश्वास यावेळी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पत्रकार संघाचे सदस्य प्रसाद माधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार राजेश मोंडकर, माजी अध्यक्ष प्रविण मांजरेकर, विजय देसाई, राजू तावडे, अँड. संतोष सावंत, सचिन रेडकर, अमोल टेंबकर, दीपक गांवकर, रामचंद्र कुडाळकर, उमेश सावंत, रूपेश हिराप, विनायक गांवस, नरेंद्र देशपांडे, सिद्धेश सावंत, भुवन नाईक, प्रसाद माधव, अशोक बोलके, सचिन मांजरेकर जतिन भिसे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here