अमोल टेंबकर; विश्व डान्स अॅकेडमीच्या माध्यमातून गुरूपौणिमे निमित्त नृत्यांगनाचा सन्मान…
सावंतवाडी,दि.११: मार्ग दाखविण्याचे काम गुरु करतो, मात्र कठोर परिश्रम करुन स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे मुलांनी आपल्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कठारे परिश्रम करावेत, असे आवाहन ओंकार कलामंचचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांनी येथे केले. सावंतवाडी येथे विश्व डान्स अॅकेडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डान्स अॅकेडमीचे संचालक तुळशीदास आर्लेकर, शितल आर्लेकर, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक सुधीर बुवा, पत्रकार शुभम धुरी, भुवन नाईक, कोरिओग्राफर आकाश लाखे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.टेंबकर म्हणाले, गुरू पौणिमेचे औचित्य साधून डान्स अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांचे करण्यात आलेले कौतूक हे त्यांना कायम प्रेरणा देणारे ठरणार आहे. लहान वयातच मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे गरजेचे आहे. त्याचा फायदा त्यांना भविष्यात नक्कीच होतो.
यावेळी श्री.धुरी म्हणाले, लहानपणा पासून मुलांना आई-वडील आणि त्यानंतर प्रत्येक शिकवत जाणारा व्यक्ती हा गुरूच्या स्वरुपात भेटतो. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग करुन यशस्वी होण्याकडे वाटचाल करावी. कठोर परिश्रम केल्यानंतर यश नक्कीच मिळते, मात्र ते मिळाल्यानंतर पाय जमिनीवरच ठेवून पुढील प्रवास करणे गरजेचे आहे .
यावेळी श्री. आर्लेकर म्हणाले, डान्स अॅकेडमीच्या माध्यमातून पुरूष असताना सुध्दा भरतनाट्य सारखी कला शिकवू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. भविष्यात येथील मुले मोठ्या पडद्यावर चमकावित यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे.
यावेळी श्री.बुवा यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. यावेळी श्वेताबंरा सावंत, निधी सातोळेकर, निधी खडपकर, आरोही जाधव, गायत्री शेणई, श्रीशा प्रभूदेसाई, पौर्णिमा बाबज, सौम्या हरमलकर, भार्गवी बुवा, अंतरा मोर्ये, श्रेया मोर्ये, खुशी नाईक, यत्वीका सावंत आदी नृत्यांगनांचा सन्मान करण्यात आला.