सावंतवाडी,१३: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री साळुंखे यांची भेट घेऊन सावंतवाडी शहरातील भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच सर्वच भागातील नाले व गटारांची त्वरित साफसफाई करून घ्यावी ,जुना शिरोडा नाका मळगाव रेल्वे स्टेशन रोड येथील एमजीएनएल कंपनीने धोकादायक वळणावर खोदून ठेवलेल्या रस्त्याचं त्वरित काम करून घ्यावे ,इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गटारात टाकण्यात आलेले माती त्वरित काढून घ्यावी, सावंतवाडी एसटी आगारातील कचरा नेण्यासाठी वाहन उपलब्ध करून द्यावे, अशा विविध समस्यांबाबत तसेच पावसाळा सुरू होत असल्याने योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,काशिनाथ दुभाषी, हिदायतुल्ला खान ,राकेश नेवगी ,इफ्तिकार राजगुरू, याकूब शेख, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Home ठळक घडामोडी सावंतवाडी शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट…