सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद.

0
163

विविध सामाजिक संस्था, संघटनेला पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव.

प्रतिनिधी: विठ्ठल ममताबादे

उरण दि.०५: सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबूसरे या संस्थेची स्थापना २० एप्रिल २०२२ रोजी झाली. या संस्थेच्या माध्यमातून रविवार दि. ०४ जून २०२३ रोजी उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे सकाळी १० ते दुपारी ०३ या वेळेत रक्तदान शिबीर व आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार २००२२ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.संस्था स्थापन झाल्यापासून हा संस्थेचा पहिलाच उपक्रम होता.या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे यांच्या माध्यमातून व समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.एकीकडे रक्तदान सुरु असतानाच दुसरीकडे उरण मधील विविध सामाजिक संस्थांना, संघटनांना आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार २०२३ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी ३५ हून अधिक विविध सामाजिक संस्था, सघटनांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर म्हात्रे, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव संजय म्हात्रे, कार्याध्यक्ष पदमाकर पाटील,खजिनदार शैलेश भोजाने, सल्लागार राजू मुंबईकर,विठ्ठल ममताबादे यांच्यासह सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक यांनी तसेच मनीष पाटील यांनी केले. एकंदरीत सदर संस्थेचा पहिलाच उपक्रम मोठया उत्साहात उत्तम प्रतिसादासह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here