पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्राम पंचायत निगुडे येथे मोठ्या उत्साहात साजरी

0
79

सावंतवाडी,दि.३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामपंचायत निगुडे येथे साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की नारीशक्तीचा सन्मान हाच देशा अभिमान हा शासनाने एक चांगला उपक्रम राबवून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना योग्य तो सन्मान देण्याचे काम यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले आहे.आणि हा सन्मान मला करण्याचं भाग्य मिळालं हे मी माझा भाग्य मी समजतो यावेळी अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी गावांमध्ये १५ जणांनी अर्ज केले होते. त्यातील दोघांचे अर्ज विचारात घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. श्रीमती शुभदा गंगाराम गावडे व सविता नारायण गावडे या ज्येष्ठ महिलांचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर यांनी सत्कार केला. तसेच निगुडे जिल्हा परिषद शाळा निगुडे नंबर १ चे मुख्याध्यापक विजय नेमळेकर व सहशिक्षक शांताराम असंनकर व ग्रामसेविका तन्वी गवस यांची बदली झाली त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम यावेळी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला निगुडे उपसरपंच गौतम जाधव, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच समीर गावडे, ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे, सुप्रिया आसवेकर, रवींद्र गावडे तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, पोलीस पाटील सुचिता मयेकर, अंगणवाडी सेविका प्रियांका राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर, मदतनीस लक्ष्मी पोखरे, विजयालक्ष्मी शिरसाट, तसेच महिला ममता गावडे, शुभदा गावडे कविता गावडे, रमेश निगुडकर, निगुडे तलाठी भाग्यश्रीला शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी लवु जाधव, डाटा ऑपरेटर परेश गावडे, नळ कामगार मधुकर जाधव, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here