सभेत ६८ प्रकरणांपैकी ६५ प्रकरणे मंजूर तर तीन प्रकरणे नामंजूर
सावंतवाडी,दि.३१: सावंतवाडी तालुका संजय गांधी योजना समितीची सभा गुरुवार दिनांक २५ मे रोजी तहसीलदार सावंतवाडी श्री अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेत एकूण ६८ प्रकरणांपैकी ६५ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर (३)तीन प्रकरणे नामंजूर करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान या योजनेमध्ये एकूण ४४ अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी ४२ अर्जांना मंजुरी देण्यात आली तर दोन अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी विधवा नि.वे योजना यामध्ये एक अर्ज आला होता त्याला मंजुरी देण्यात आली. तसेच श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना यामध्ये एकूण २२ अर्ज आले होते त्यामध्ये २१ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली तर एक अर्ज नामंजूर करण्यात आला.तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यामध्ये एक (१) अर्ज आला होता ते प्रकरण मंजूर करण्यात आले.
यावेळी सदर सभेला गटविकास अधिकारी पंचायत समिती वासुदेव नाईक, सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे, नायब तहसीलदार मनोज मुसळे, अव्वल कारकून डी. व्ही. मेस्त्री आदी उपस्थित होते.