डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना सेवेत शासनाने अजुन दोन वर्षाची मुदतवाढ द्यावी..

0
76

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची मागणी

सावंतवाडी, दि.२० : येथील कुटीर रुग्णालयाचे स्त्री रोग तज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे ३१ मे ला सेवानिवृत्त होत असून शासनाने डाॅ.दुर्भाटकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याला गरज असल्याने दोन वर्षाची मुदत वाढवून दयावी, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सहकारी नगरसेवकांनी केली आहे.
दरम्यान याबाबत योग्य तो निर्णय घ्या अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असाही इशाराही साळगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे.
साळगावकर म्हणाले,सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. दुर्भाटकर यांची मुदत ३१ मे ला संपत आहे. ते वयोमानानुसार सेवा निवृत्त होत आहेत. परंतु गेली २२ वर्षे त्यांनी सावंतवाडी शहरातील लोकांना दिलेली सेवा लक्षात घेता त्यांना दोन वर्षाची आणखी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी साळगावकर व माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.
यापूर्वी या ठिकाणी कार्यरत असलेले डॉ. उत्तम पाटील यांनाही अशाप्रकारेच मुदतवाढ देण्यात आले. त्यानुसार आता दुर्भाटकर यांना सुद्धा मुदतवाढ देण्यात यावी, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना दिला आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे या चार तालुक्यात एक महत्त्वाचे रुग्णालय असून तेथे डॉक्टरांची उणीव भासत आहे नवीन डॉक्टर जिल्ह्यात यायला बघत नाहीत आणि आहे.त्या डाॅक्टराची बदली होते किंवा सेवानिवृत्त होतात मात्र त्याच्या जागेवर कोणतेही वैद्यकीय अधिकारी येत नाही त्यामुळे जर हे उपजिल्हा रुग्णालय व्यवस्थित सुरू व्हावे असे शासनाला वाटत असेल तर डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर याच्या सारख्या स्त्री रोग तज्ञांना सेवानिवृत्तीनंतर ही याच मुदत वाढवून दिली गेली पाहिजे अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.
डाॅ.दुर्भाटकर याच्या मुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे चांगल्या प्रकारे चालते त्यामुळे जनतेची गरज ओळखून त्याना मुदत वाढ द्यावी अशी मागणी साळगावकर यांच्याकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here