मळेवाड येथील पर्यटन महोत्सवाला आज भाजप प्रदेश सचिव निलेश राणे राहणार उपस्थित.
सावंतवाडी,दि.०४ : मळेवाड येथील पर्यटन महोत्सवाची आज सांगता होणार असून भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांनी ३० एप्रिल ते ०४ मे २०२३ असा पाच दिवशीय भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव २०२३ चे आयोजन केले आहे.या महोत्सवाचा आज रात्री ८ वाजता सांगता समारंभ होणार असून भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेशजी राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच भाजप प्रवक्ते संजू परब व विशाल फौंडेशन अध्यक्ष विशाल परब उपस्थित राहणार आहेत.या सांगता समारंभानंतर रात्री ठीक साडेआठ वाजता पर्यटन महोत्सवाचे खास आकर्षण असलेली सिंधू सुंदरी २०२३ ही सौंदर्य स्पर्धा राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड शाळा नं १च्या पटांगणावर संपन्न होणार आहे.तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच तथा मंडळाचे अध्यक्ष हेमंत मराठे यांनी केले आहे.



