सांगेली सरपंच श्री लवू भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आपतग्रस्त भागाची पाहणी..
सावंतवाडी, दि.०८: तालुक्यातील सांगेली येथे आज संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात सांगेली येथील खालचीवाडी, गुरगुटवाडी, देवकरवाडी,सावंतटेंब, टेंबकरवाडीतील घरांवर झाडे कोसळून पडल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने अनिल गावडे यांच्या घरावर फणसाचे झाड, शिवराम परब यांच्या घरावर नारळीचे झाड, उज्वला रमेश राणे यांच्या घरावर नारळ,भास्कर कोचरेकर यांच्या घरावर नारळ निधी देवले यांच्या घरावर आंब्याचे झाड तर सखाराम राऊळ यांच्या घरावर मोठे चाफ्याचे झाड कोसळल्याने या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान या ठिकाणी सांगेली सरपंच, उपसरपंच संतोष नार्वेकर आणि त्यांचे सहकारी यांनी भेट देऊन झाड हटवण्यासाठी मदत कार्य सुरू केले आहे. सरपंच भिंगारे यांनी घटनास्थळावरून तहसीलदार यांना कॉल करून आपदग्रस्त भागाचे पंचनामे तात्काळ करून नुकसानग्रस्त ग्रामस्थांना शासन स्तरावर आर्थिक मदत मिळावी अशा प्रकारची मागणी केली आहे.
या वादळ वाऱ्याचा फटका वीज वितरण कंपनीलाही मोठ्या प्रमाणात बसला असून सांगेली भागातील विजेचे खांब वादळी वाऱ्यात मोडून पडल्याने या भागात विजेची समस्या ही निर्माण झाली आहे.
मात्र सुदैवाने या वादळी वाऱ्यात कोणतेही जीवित हानी झाली नाही.