दोडामार्ग, दि.८ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तालुका दोडामार्ग व सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मराठी शाळा पटांगण दोडामार्ग -बाजारपेठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी दुर्मिळ असलेला बॉम्बे ब्लड ग्रुप हा ज्यांचा रक्तगट ओ (पॉझिटिव्ह / निगेटिव्ह ) आहे अशा व्यक्तींमध्ये हा रक्तगट आढळण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रक्तगटाच्या रक्तदात्यांनी अथवा व्यक्तींनी या शिबिरात सहभाग घेऊन मोफत तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तालुका दोडामार्ग सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात येत आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी भूषण सावंत 📲 9309978684, वैभव रेडकर 📲7083572653) गीतांजली सातार्डेकर 📲9421026075 गणपत जाधव 📲9623861189 , दीपक जाधव 📲 9422778815, शंकर जाधव 📲 9765322432 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.