भाजपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजना तळागाळात पोचविण्यासाठी पुढाकार घ्या.. राजन तेली

0
151

कोलगाव येथील महाविजय यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात तेली यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन..

सावंतवाडी,दि.०५ : भाजपाच्या माध्यमातून केंद्रात आणि राज्यात राबविण्यात आलेल्या योजना यशस्वी पध्दतीने राबवा सर्व योजना तळागाळात पोचण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
ते कोलगाव येथे महाविजय यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष रविंद्र मडगावकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, उपसरपंच दिनेश सारंग, प्रमोद गावडे, चंद्रकांत जाधव, अब्दुल साठी, रोहित नाईक, संदीप हळदणकर, आत्माराम चव्हाण उपस्थित होते.
तेली म्हणाले, भाजपाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विविध योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत या सर्व योजना शासनाकडुन राबविण्यात येतात त्या जास्तीत-जास्त लोकापर्यत पोहोचविण्याचा आमचा मानस असून तुम्ही सर्वानी साथ द्या असे आवाहन केले.
काही दिवसांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका येणार आहेत. या निवडणूकांमध्ये भाजपच्या चिन्हावर असलेल्या व्यक्तीला आपले अमुल्य मत देवून संबधित उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन करीत मागच्यावेळी अवघ्या काही मतांनी सारंग यांना आपला पराभव पत्करावा लागला.
याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सर्वानी दक्षता घेणे गरजेचे आहे. सारंग हे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्याच बरोबर चांगले समाजसेवक आहेत. आपल्या गावाचा मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी त्यांचे कायम प्रयत्न असतात. त्यामुळे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी येणार्‍या काळात कोलगावातील जनतेने ठाम पणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सारंग म्हणाले, या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी गावाच्या विकासासाठी आला आहे. पाणी पुरवठा योजनेसह साकव रस्त्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे आता येथील जनतेने भाजपा सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी संजू परब, रवी मडगावकर यांनी ही आपले विचार मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here