सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उद्या ठाकरे गटाचे ढोल बजाओ आंदोलन..
सावंतवाडी,दि.३१: येथील बस स्थानक आवारात उद्या एक(१) एप्रिल रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात ढोल बजाओ आंदोलन छेडण्यात येणार आहे.
अशी माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली आहे.
यावेळी त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदार संघाततील विकास कामे प्रलंबित असून मंत्री केसरकर हे फक्त घोषणाबाजी करत आहेत मात्र प्रत्यक्षात कोणतीही विकास कामे पूर्ण केलेली नाहीत त्यामुळे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे.
यासाठी होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.