मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून वेर्ले येथील रस्त्यासाठी ५ लाख निधी..

0
102

शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन..

सावंतवाडी, दि.२५: तालुक्यातील वेर्ले गावातील पलीकडचीवाडी ते रवी राऊळ यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता यासाठी शिवसेना आमदार दीपक भाई केसरकर यांच्या माध्यमातून पाच लाख रुपये एवढा निधी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी देण्यात आला.
या रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी,ओवळीये माजी सरपंच विनायक सावंत, वेर्ले माजी उपसरपंच सुभाष राऊळ, तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका प्रमुख राणे यांनी बोलतांना या भागातील विकास कामे करुन घेण्यासाठी मंत्री केसरकर यांच्या पाठीमागे भक्कपणे उभे रहा असे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here