म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांच्या हस्ते उद्घाटन…
सिंधुदुर्ग,दि.०७: होळी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धाकोरे गावात दोन सोलार लाईटचे लोकार्पण करण्यात आले धाकोरे धनगरवाडी सड्यातील वस्तीवर तसेच हनुमान मंदिर येथे ह्या दोन सोलर लाईटचे लोकार्पण म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक व मनसे लॉटरी सेनेचे तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. मागील काही वर्षे या भागांमध्ये रात्रीच्या वेळी लाईट अभावी लोक त्रस्त होते. सदरबाब मनसेचे धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक यांच्या लक्षात येताच त्यांनी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या कानी घातली व त्वरित त्याची दखल घेतली. मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम सह संपर्क अध्यक्ष सूर्यकांत मयेकर यांच्या मार्फत दोन सोलर लाईट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले व काल त्याचे लोकार्पण करण्यात आले यावेळी मनसे लॉटरीसेनेचे अध्यक्ष श्री गणेश कदम यांचे धाकोरेवासी यांनी आभार मानले. यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार सरपंच सौ स्नेहा मुळीक लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक लॉटरी सेनेचे माजी सचिव आबा चिपकर म.न.वि.से उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक शाखाध्यक्ष निलेश मुळीक तसेच तेथील ग्रामस्थ उपस्थित होते.