चर्मकार उन्नती मंडळाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी विनायक चव्हाण..

0
11

सचिव पदी जगदीश चव्हाण तर खजिनदारपदी सूर्यकांत सांगेलकर यांची बिनविरोध निवड

सावंतवाडी,दि.२७: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडीच्या अध्यक्षपदी अभियंता विनायक चव्हाण यांची एक मताने निवड झाली असून सचिव पदी बँकेचे शाखा व्यवस्थापक जगदीश चव्हाण तर खजिनदारपदी सूर्यकांत सांगेलकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
सावंतवाडी येथील समाज मंदिर सभागृहात झालेल्या सावंतवाडी तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन कार्यकारणी निवड जिल्ह्याचे सहसचिव व निर्वाचन निवडणूक अधिकारी म्हणून बाबुराव गोविंद चव्हाण यांनी कामकाज पाहिले.
या सर्वसाधारण सभेसाठी मावळते अध्यक्ष गणेश म्हापणकर मावळते सचिव गुंडू चव्हाण तसेच पी बी चव्हाण आदि पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या सावंतवाडी शाखा तालुका अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष म्हणून विनायक चव्हाण सचिव म्हणून जगदीश चव्हाण व खजिनदार म्हणून सूर्यकांत सांगेलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. समाज बांधवांना विकास प्रक्रियेत आणताना त्यांच्या उन्नतीसाठी यापुढे आपण काम करणार असून समाजातील बड्या पदावर पोहोचलेल्या मंडळींनी मागे वळून पाहत असताना समाजातील दुर्बल आणि पीडित घटकांकडे लक्ष द्यावे. समाज बांधवांच्या प्रगती आणि उन्नतीसाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी या निवडीनंतर सांगितले तर सावंतवाडी
तालुका कार्यकारणी लवकरच जाहीर करणार असल्याचे अध्यक्ष विनायक चव्हाण यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here