सावंतवाडीत मासे विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईच्या विरोधात मनसे आक्रमक…

0
184

सावंतवाडी,०१ : येथील बस स्थानक परिसरात मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई केल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्र हाती घेतला. यावेळी त्यांनी पालिकेकडे धाव घेत जप्त केलेल्या माशांच्या टोपल्या पुन्हा “त्या” विक्रेत्यांना देण्यास भाग पाडले. दरम्यान मंगळवारच्या आठवडा बाजारात फुटपाथ सोडून रस्त्यावर दुकान थाटणाऱ्या विक्रेत्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी त्यांनी “त्या” विक्रेत्यांना केवळ फुटपाथवरच दुकान लावण्याचा सल्ला दिला. तर अरेरावी केल्यास पालिकेच्या माध्यमातून कारवाई करायला भाग पडू, असा इशाराही उपस्थितांकडू देण्यात आला.

यावेळी मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, राजू कासकर, अनिल केसरकर, कौस्तुभ नाईक, आदींसह भाजपाचे पदाधिकारी महेश पांचाळ हे सुद्धा उपस्थित होते.

येथील बस स्थानक परिसरात मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आज पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दणका दिला. वारंवार सूचना देऊनही त्या ठिकाणी संबंधित विक्रेते मासे विक्री करण्यासाठी बसत असल्यामुळे त्यांच्या माशाच्या टोपल्या पालिकेकडून जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र याबाबतची माहिती मिळतात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पालिका कार्यालय गाठले. सर्वसामान्य मासे विक्रेत्यावर होणारी अशी कारवाई चुकीची आहे. त्यामुळे जप्त केलेल्या टोपल्या पुन्हा त्यांना द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर संबंधित विक्रेत्यांना समज देऊन “त्या” टोपल्या पालिका पदाधिकाऱ्यांनी परत केल्या. यावेळी आठवडा बाजारात काही विक्रेते फुटपाथ सोडून गटारात सुद्धा दुकाने थाटत असल्यामुळे त्याचा अडथळा वाहतुकीला होत आहे. सायंकाळच्या वेळी खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्यामुळे त्या ठिकाणी एखादा अपघात घडू शकतो. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांना फुटपाच्या बाहेर दुकाने न लावण्यासाठी सक्त ताकीद द्या, अशी मागणी उपस्थितांनी केली. मात्र वारंवार सांगून सुद्धा व्यापारी ऐकत नाहीत, असे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मनसेकडून आक्रमक पवित्र हाती घेत स्वतः त्यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना दुकाने मागे लावण्याचा सल्ला दिला. अन्यथा पालिकेकडून होणाऱ्या कारवाईला सामोरे जा, असा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here