राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांचा पुढाकार
सावंतवाडी, दि.३०: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात विविध विभागात भरती प्रक्रियेसाठी मागविण्यात आलेले ऑनलाईन अर्ज राष्ट्रवादीच्या माध्यमातून या मोफत भरुन देण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी यासाठी पुढाकार घेतला असून शहरातील यशवंतराव चव्हाण सेंटरवर सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र घेऊन अर्ज भरून नोंदणी करावी असे आवाहन घारे परब यांनी केले आहे.
राज्यात विविध खात्यातील भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होत आहे २५ तारखेपासून त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे राज्यात ८ हजार १६९ पदे भरली जाणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी पात्र इच्छुक उमेदवारांसाठी हे ऑनलाईन अर्ज भरणे प्रक्रिया शहरातील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये मोफत सुरू केली आहे सध्या या ठिकाणी पात्र इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून इच्छुकांनी फक्त परीक्षा शुल्क भरून अर्ज दाखल करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना सौ.घारे परब म्हणाल्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी दहावी बारावी पास विद्यार्थ्यांपासून पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे त्यामुळे इच्छुकांनी या संधीचा फायदा उठवण्याबरोबरच आवश्यक त्या विभागात अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा राष्ट्रवादीच्या माध्यमातून अशा उमेदवारांना मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.१४ फेब्रुवारी ही अर्ज ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख असल्याने लवकरात लवकर इच्छुकाने अर्ज दाखल करावा त्यानंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन शिबिर करण्यात येणार आहे, तर यशवंतराव चव्हाण सेंटरवर सद्यस्थितीत १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींना मतदान नोंदणीसाठी आवश्यक प्रक्रिया ही हाती घेतली आहे. त्याचा लाभही तालुक्यातील तरुण तरुणींनी घ्यावा असे आवाहन यावेळी अर्चना घारे परब यांनी केले आहे.
यावेळी चित्रा बाबर देसाई उपस्थित होत्या.