सावंतवाडी,दि.१८ : अखिल भारतीय मराठा महासंघ, सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी शहरात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानातील मुख्य दरवाजा परिसरात शिवजयंती महोत्सव २०२५ चे आयोजन केले आहे.
या महोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न होणार असून सायंकाळी सहा वाजता शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर बिबवणे हायस्कूल (ता. कुडाळ) येथील लेझीम पथकाचा ‘लेझीम खेळ’ कार्यक्रम, त्यानंतर समाजाच्या प्रतिष्ठित मान्यवर, विद्यार्थी आणि इतर गुणवंतांचा सन्मान व सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. तसेच कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबुराव शंकर कांबळे आणि पार्टी यांचा पोवाडा कार्यक्रम तसेच शिव कथेवर समर्पित पोवाडा गीतांचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे.
तरी या प्रेक्षणीय कार्यक्रमास उपस्थित राहून शिवप्रेमी व प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच शिवरायांना नमन करण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत व सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत यांनी केले आहे.