भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उत्साहात

0
34

सावंतवाडी,दि.१९: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन, पुस्तक प्रदर्शन आणि आवडत्या पुस्तकावर परिक्षणात्मक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उदघाटन प्राचार्य डॉ.रमण बाणे यांचे हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रदर्शनात थोर व्यक्तींची चरित्रे , आत्मचरित्रे, कथा-कादंबऱ्या, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी ग्रंथ, संदर्भ ग्रंथ व ललित साहित्याची मांडणी करण्यात आली होती. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा सर्व भाषांतील साहित्य यावेळी उपलब्ध होते._
पुस्तक परीक्षण स्पर्धेत डिग्री व डिप्लोमा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये डिग्री विभागातून कोमल सोनावणे (इनव्हीजीबल सिटीज) हिने प्रथम, आर्या प्रभूदेसाई (माझी जन्मठेप) हिने द्वितीय, सानिया गावडे (सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल) हिने तृतीय तर हर्षाली आळवे (यू आर बॉर्न टू ब्लॉसम) हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. डिप्लोमा विभागातून मनिष सावंत (युगंधर) याने प्रथम, सायली गिरी (अग्निपंख) हिने द्वितीय, तनया दळवी (मन में है विश्वास) हिने तृतीय तर संदेश बेळेकर (रिच डॅड पुअर डॅड) याने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डिप्लोमा मेकॅनिकल विभाग प्रमुख अभिषेक राणे, डिग्री मेकॅनिकल विभाग प्रमुख स्वप्नील राऊळ, कॉम्प्युटर विभाग प्रमुख मनोज खाडिलकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रंचालन प्रा.संचिता कोलापते यांनी तर आयोजन ग्रंथपाल मानसी कुडतरकर व एनएसएस प्रमुख महेश पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here