बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

0
37

सावंतवाडी,दि.१९: येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वार्षीक कला प्रदर्शन कल्पक दरम्यान जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सृजनशील अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलात्मक गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्यावतीने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
या चित्रकला स्पर्धेसाठी नर्सरी ते सिनीअर केजीसाठी माझा आवडता पक्षी, इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थीसाठी माझे स्वप्नातील घर, इयत्ता ५ वी ते ७ वीसाठी गावची जत्रा, इयत्ता ८ वी ते १० वीसाठी मला आवडलेले सुंदर मंदीर तर खुल्या गटासाठी राजकारणाचे बदललेले स्वरुप (पोस्टर) हे विषय आहेत. मात्र या स्पर्धेच्या प्रथम फेरीचे आयोजन प्रत्येक प्रशालेने आपल्या प्रशालेमध्ये करावयाचे आहे. त्यानुसार या स्पर्धेच्या प्रत्येक गटात प्रशालेने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून ही चित्रे ३० जानेवारीपर्यंत बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अ.आ.), सर्व्हे नं. ५४/०१, वन विभागाजवळ, सालईवाडा सावंतवाडी या पत्त्यावर पाठवावी.
बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट कडे प्राप्त झालेल्या या सर्व चित्रांचे परीक्षण केल्यानंतर प्रत्येक प्रशालेतील या स्पर्धेतील प्रत्येक गटाच्या प्रथम क्रमांकांना या चित्रकला स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निमंत्रित केले जाणार आहेत. या चित्रकला स्पर्धेची अंतिम फेरी बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या वार्षिक कला प्रदर्शन कल्पक २०२५ दरम्यान घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यास रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह, देवून गौरविण्यात येणार असून प्रत्येक स्पर्धकास स्पर्धा सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. तसेच या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी २३६३ – २७५३६१ आणि ९४०५८३०२८८ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here