कणकवली, दि.२८ : गणेश जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातुन सिद्धी संतोष नारकर उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष यांच्यामार्फत मोफत आरोग्य शिबिराचे मांगवली सिद्धवाडी येथे आयोजन करण्यात आले होते.
कणकवली जिल्हा रुग्णालय मधील डॉक्टर धर्माधिकारी आणि डॉक्टर पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडला.
या आरोग्य शिबिराला शेकडो ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवत उस्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे विद्यार्थी सेना उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष निलेश मेस्त्री, कणकवली तालुकाध्यक्ष धनराज गोरे, गिरीश उपरकर आदी मनसैनिक उपस्थित होते.