सकल मराठा समाजाच्या वतीने लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन-सीताराम गावडे

0
10

आगावू नाव नोंदणी करुन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

सावंतवाडी,दि.१८: सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील वधुवरांसाठी लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,तरी इच्छूक वधुवरांनी मोठ्या संख्येने आपली नाव नोंदणी करुन मराठा समाजाचा हा वधुवर मेळावा यशस्वी करावा असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, उपाध्यक्ष, उमाकांत वारंग,विलास जाधव, नितीन गावडे,सुंदर गावडे व कार्यकारिणी मंडळाने केले आहे.
मराठा समाजातील अनेक मुले मुली इच्छीत वर वधू मिळत नसल्याने अविवाहित आहेत,वराची किंवा वधुची इतंभूत माहिती घेऊन त्यांना मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाज प्रयत्न करणार आहे,त्याचे पहिले पाऊल या वधूवर महामेळाव्याने उचचले आहे ,अनेक मात्या पित्यांनी सकल मराठा समाजाकडे वधूवर मेळावा लावण्याची विनंती केल्याने समाजाच्या आग्रहा खातर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जे या वधूवर महामेळाव्यात सहभागी होऊ इच्छित असतील त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आपली नावे सकल मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे,८४८४८२७९९३, उपाध्यक्ष उमाकांत वारंग ९४२३५१२६२२ विलास जाधव,९४२२५९६०२५,या व्हाट्सअप नंबरवर नोंदवावीत असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here