वेंगुर्ले,दि.०५: कम्प्युटर सायन्स (CS) हॅकेथॉन उत्सव (प्लग) २०२४-२५ स्पर्धेमध्ये कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ चा जिल्ह्यात तृतीय क्रमांक आला.
एलएफइ, कोड इन्हान्स लर्निंग, ऍमेझॉन फ्युचर आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यामार्फत इयत्ता ४ थी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संगणक विज्ञान व कोडींग बाबत हॅकेथॉन उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. या उत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील दहा शाळांची निवड अंतिम फेरी साठी करण्यात आली. प्रत्येक शाळेच्या गटात एकूण तीन विद्यार्थी होते.
अंतिम १० गटांमधून कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील विद्यार्थ्यांचा जिल्ह्यात तृतीय क्रमांक आला. पारितोषिक म्हणून शाळेला ४३ इंची टीव्ही, पाच टॅब, ऍलेक्सा इको डॉट, फिसीकल कॉम्पुटिंग कीट मिळाले. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पदवीधर शिक्षक गणेश नाईक यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या या यशाबद्दल शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अजित तांबे, पांडुरंग चिंदरकर, प्रतिमा साटेलकर तसेच व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.